वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

माझी शंका फिटले ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074643 · अभंग क्र. ९०९

909.
माझी शंका फिटले ।
लाजा सांडिले ।
अवघे घातले ।
मज निरसूनिया ॥१॥
अठरा भार वनस्पती ।
सुरवर वोळंगती ॥
देवोदेवि आदिपती ।
कृष्ण काळा गे माये ॥२॥
ऐसा कृपानिधि सांवळा ।
की बापरखुमादेविवरू गोंवळा ॥
त्याचा मज चाळा ।
बहु काळ गे माये ॥३॥

अर्थ :
माझ्या ठिकाणची मी देह आहे की आत्मा आहे अशा तऱ्हेची शंका नाहीशी होऊन गेली. मी देह नसल्यामुळे देहसंबंधी लज्जा राहिली नाही. विचाराने अंतःकरणनिष्ठ काम क्रोधादि सर्व मंडळींचा निरास करून टाकला. सर्व प्रकारच्या वनस्पती, सर्व देवगण ज्याच्या चरणी लागतात तो देवांचा अधिपति भगवान श्रीकृष्ण कृष्णवर्णाचा आहे. असा जो कृपानिधी सांवळ्या रंगाचा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल गायी वळणारे त्याचा मला बहुत काल छंद लागला आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग