वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

न करी आळस रामनाम घेत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087649 · अभंग क्र. ८९८

898.
न करी आळस रामनाम घेता । वाचे उच्चारिता काय वेंचे ॥१॥
न लगे द्रव्य धन वेचणेंचि कांही । रामनाम गाई सदा मुखी ॥२॥
सोहळे आचार न लगे विचार । पवित्र परिकर नाम मुखी ॥३॥
शुद्ध याति कुळ अथवा चांडाळ । स्त्री अथवा बाळ हो का नीच ॥४॥
एका जनार्दनी नाही यातीचे कारण । वाचे उच्चारण तोचि शुचि ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग