वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

त्रिभुवनींचे सुख पहा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074651 · अभंग क्र. ८९६

896.
त्रिभुवनींचे सुख पहावया नयनी ।
दिनरात्री धणी न पुरे माझी ॥१॥
विटेवरी सांवळा पाहता पै डोळा ।
मन वेळोवेळा आठवितु ॥२॥
सागरी भरीते दाटे तैसे मन उल्हाटे ।
वाट पाहो कोठे तुझी रया ॥३॥
बापरखुमादेविवरू पूर्ण प्रकाशला ।
कुमुदिनी विकासला तैसे जाले ॥४॥

अर्थ :
त्रिभुवनाचे सुख जो परमात्मा त्याला रात्रंदिवस पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही. जो विटेवर असलेला सांवळा विठोबाराय त्याची मन वारंवार आठवण करीतच असते. सागरामध्ये जशी भरती दाटते त्याप्रमाणे मन त्याच्या चिंतनांत रंगून जाते. आता तुझी कोठे म्हणून वाट पाहुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वत्र पूर्ण प्रकाशीत आहेत हे कमळिणीच्या विकासावरून जसे कळून येते त्याप्रमाणे अंतःकरणवृत्तीच्या विकासावरून त्याचे प्रकाशत्व कळून येते. त्या कमळिनीप्रमाणे माझे मनाची स्थिती झाली आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग