वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

म्हणती सकळ द्विज जाव

🙏 4. संत नामदेव · ABH-081827 · अभंग क्र. ९०४

904.
म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना | तेथुनी पत्र आणा ते वंद्य करू ॥१॥
नाही जाती कुळ वर्ण अधिकार | क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नोहे ॥२॥
नव्हो देवगण यक्ष ना किन्नर | ऋषि निशाचर तेही नव्हो ॥३॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट | निजबोधे इष्ट स्वरूप माझे ॥४॥
नव्हो आप तेज वायू व्योम मही | महत्तत्व तेही विराट नव्हो ॥५॥
नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण | अनुभूती भजन होउनी नव्हे ॥६॥
निवृत्ती म्हणतसे ऐके ज्ञानेश्वरा| माझी परंपरा ऐसी आहे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग