राम म्हणोनि दीन येती
908.
राम म्हणोनि दीन येती काकुलती । त्याच्या यातनेचे दोषे सांगावे किती ॥१॥
काय साचलें नाठवे पाप । नामे निष्पाप महादोषी ॥२॥
चित्रगुप्त जव पाहे वही । कोरडे पान रेघही नाही ॥३॥
खोडी ना मोडीसमुळ उडे । एका जनार्दनी नामे पाप झडे ॥४॥
