वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

यातिकुळ माझे गेले हा

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074645 · अभंग क्र. ८९९

899.
यातिकुळ माझे गेले हारपोनी ।
श्रीरंगावांचुनी आनु नेणे ॥१॥
किती वो शिकवाल मज वेळोवेळा ।
मी तव गोवळा रातलिये ॥२॥
अष्टभोग भोगिता माते नाही चाड ।
भक्तिप्रेम गोड लेइले गे माये ॥३॥
बापरखुमादेविवरु जीवींचा जिव्हाळा ।
कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥४॥

अर्थ :
श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आता श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. संभावित स्त्रीयानी परपुरूषाच्या ठिकाणी प्रेम ठेवू नये. ह्या बुद्धिने तुम्ही मला पुष्कळ व वारंवार उपदेश करता परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. स्त्रीपुरूष भोगांमध्ये दर्शन स्पर्शनादि अष्टभोग आहेत. त्याची आता मला चाड नाही. कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड़ लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे. माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचा पति जे श्रीविठ्ठल असे जे माझे बाप ते काही केल्या आता जीवापासून वेगळा होत नाहीत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग