न सापडे ऐसी कधी ।
901.
न सापडे ऐसी कधी ।
वेळ लागली ते संधी ॥१॥
हरिचे गुण वाचे यावे ।
श्रवणी श्रवण ते करावे ॥२॥
गेली जातील वर्षे काळ ।
आयुष्या वेचूनिया निर्फळ ॥३॥
निळा म्हणे यालागी करा ।
वेगे आता चित्ती धरा ॥४॥
901.
न सापडे ऐसी कधी ।
वेळ लागली ते संधी ॥१॥
हरिचे गुण वाचे यावे ।
श्रवणी श्रवण ते करावे ॥२॥
गेली जातील वर्षे काळ ।
आयुष्या वेचूनिया निर्फळ ॥३॥
निळा म्हणे यालागी करा ।
वेगे आता चित्ती धरा ॥४॥