झगमगी काजवे ।
899.
झगमगी काजवे ।
रात्री दिवसा नव्हे ठावे ॥१॥
म्हणोनिया न ये मोला ।
नाश पदरी असे त्याला ॥२॥
दिसे पतंगाचा रंग ।
नाही धुतला तोवरी चांग ॥३॥
निळा म्हणे परमहंस ।
झाला बहुरुपी परि ते फोस ॥४॥
899.
झगमगी काजवे ।
रात्री दिवसा नव्हे ठावे ॥१॥
म्हणोनिया न ये मोला ।
नाश पदरी असे त्याला ॥२॥
दिसे पतंगाचा रंग ।
नाही धुतला तोवरी चांग ॥३॥
निळा म्हणे परमहंस ।
झाला बहुरुपी परि ते फोस ॥४॥