वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 146. श्री ज्ञानेश्वरांची आदि

करावे सार्थक रखुमाईन

🙏 4. संत नामदेव · ABH-081830 · अभंग क्र. ८९९

899.
करावे सार्थक रखुमाईने तेव्हा | आरंभिली सेवा अश्वत्थाची ॥१॥
जाणोनी पै देवे उग्र अनुष्ठान | तेथे जाले येणे श्रीपादाचे ॥२॥
देखोनि सत्पात्र केला नमस्कार | सारांश उत्तर बोलियेले ॥३॥
पुत्रवती होई दिधला आसीर्वाद | रखुमाईसी विनोद वाटियेला ॥४॥
माते तू हाससी श्रीपाद पुसती | स्वामी पुत्र कैसे होती पतीविण ॥५॥
भ्रतारे जाऊनी घेतला संन्यास | स्वामीने वचनास नलगे बोल ॥६॥
पुसता खाणखूण निश्चयो बाणला | श्रीपाद बोलिला सत्य सत्य ॥७॥
रखुमाईसी पुसे असे तुझे कोणी | येरी कर जोडोनी बोलीयेली ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग