असता सुखरूप मातापिता
896.
असता सुखरूप मातापिता वृद्ध | वैकुंठा स्वानंदे निघोनी गेली ॥१॥
संसाराची चिंता नाही विठ्ठलासी | अखंड वृत्तीसी समाधान ॥२॥
जाले वर्तमान ऐकिले सिदोपंती | परम तेणे चित्ती खेद केला ॥३॥
येउनी परामर्ष घेतला दोघांचा | म्हणे सांभाळ तुमचा करितो देवा ॥४॥
उदासीन वृत्ति तुमची सर्वकाळ | पदार्थ सकळ पाहिजे तो ॥५॥
दया करोनी मज आता सांभाळावे | आळंकापुरी राहावे सुखरूप ॥६॥
पुत्रसंतती काही होईल तुम्हासी | मग येईल चित्तासी ते करा सुखे ॥७॥
मग मानुनी वचन विठ्ठले तयाचे | म्हणे हे देवाचे करणे हो ॥८॥
