वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 147. गीता महात्म्य

गीता गीता गीता त्रिव

🙏 4. संत नामदेव · ABH-081850 · अभंग क्र. ९१२

912.
गीता गीता गीता त्रिवार बोलता | पाप जाय तत्वता मोक्ष जोडे ॥१॥
गीतेचा महिमा बोलवेना वाचे | बंधने जीवाची दूर होती ॥२॥
येक येक अक्षर कोटी अश्वमेध | फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त ॥३॥
येकचि तो श्लोक वाचीलिया नेमे | अंती परमधाम प्राप्त होय ॥४॥
नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता | लाभ त्याच्या हाता बोलवेना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग