वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

गुणाचेनी आटोपे आकारल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074640 · अभंग क्र. ८९४

894.
गुणाचेनी आटोपे आकारले ब्रह्म ।
भक्तभाग्य सम आले मूर्ति ॥१॥
चैतन्य परिपाठी ठसा घडलासे साकार
कृष्णची आकार गोकुळी रया ॥२॥
त्या रूपे वेधिले काय करू गे माये ।
नामरुप सोय नाही आम्हा ॥३॥
सभाह्य सभोवते चतुर्भुज सांवळे ।
सर्वभूती विवळे कृष्णरूपे ॥४॥
हरपले आकार कृष्णची क्षरला ।
वेदांसी अबोला श्रुतीसहित ॥५॥
ऐसे परब्रह्म सांवळे दैवत आमुचे ।
आता आम्हा कैचे क्रिया कर्म ॥६॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु दैवत ।
मने घर तेथे चरणी केले ॥७॥

अर्थ :
भक्तांच्या परमभाग्याने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता मायेच्या गुणांचा स्वीकार करून कृष्णरूपी मूर्तिच अवतीर्ण झाली आहे. चैतन्याचे कार्यक्रमांत हा सगुण कृष्णाचा आकार गोकुळांत अवतीर्ण झाला. त्याचे मनमोहक रूपाने मला सारखा वेध लावून टाकला. काय करू. त्यामुळे माझे नामरुपच नाहीसे झाले. शामसुंदर चतुर्भुज सांवळ्या श्रीकृष्णाने सभोवार सर्व रूपाला व्यापून टाकले. त्यामुळे असे आकार नष्ट होऊन ज्या रूपाच्या ठिकाणी श्रुतिसह वेद कुंठीत झाला. तेच कृष्णरूप लक्ष्य जे सांवळे परब्रह्म ते आमचे दैवत असल्यामुळे आम्हांला आता बाकीची क्रिया कर्म राहिली नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते आमचे दैवत असून त्याचे चरणाचे ठिकाणी माझ्या मनाने घर केले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग