पाहिले श्री शैल्य नि
893.
पाहिले श्री शैल्य निवृत्ती संगम | पापराशी भस्म देखताचि ॥१॥
चालता सुपंथी हृदयी विठ्ठलमूर्ती | मुखी नामकीर्ति गात चाले ॥२॥
अभोळ नरसिंह श्रीवासुदेव | सकळ देवराव व्यंकटाद्री ॥३॥
गेला अरुणाचळा करुनी नमन | चिदंबरा दक्षिणमथुरा कावेरी ॥४॥
वंदुनी जनार्दन गेला रामेश्वरा | हेत जाला पुरा विठ्ठलाचा ॥५॥
