वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

कर्दळी फळ कर्पूर परि

🙏 4. संत नामदेव · ABH-083246 · अभंग क्र. ८४२

842.
कर्दळी फळ कर्पूर परिमळे भिन्न | परि दोहींचे जन्म ते एकत्र जाण |
आत्मा की परमात्मा अभेद की भिन्न | चंद्र सोमकांत शून्य महाशून्य ॥१॥
सूर्य सूर्यकांतु प्रकाश एकु | साधुसंत आरति रावो ना रंकु ॥२॥
भ्रमरांच्या रुंजी मकरंद उधळती | असाध्य साधनी लागल्या ज्योती |
लयाचे लक्ष हरपली स्थिति | म्हणोनि साधुचरणी नित्य पंचारती ॥३॥
गोदेचा उगमु तो ठाईच्या ठाई | आणिके उदके ती चाली प्रवाही |
तैसी साधुसंत कृपा उन्मत्त देही | सागरा भेटली क्षीरसिंधु तेही ॥४॥
सागराचे उदक जगा विनवित | निवळुनि मागुते पूर्ण भरित |
तैसे अंतरीचे नीर ओघे हे साधुसंत | परि सागरा अंतरी न वर्णवे मुक्त ॥५॥
तेथे अनुपम्या ऐकिजे शब्दाचि रचना | हे जाणतेनो जाणा अमृतखुणा |
हे रत्न की माणिक ऐसे अनुमाना | ते पानबुडिया परसोबा लाधले निधाना ॥६॥
दुधावरील साय वरी साखर मेळवणी | जैसी जिव्हा लोधली मधु लागुनि |
तेथील गौलता ते रहस्य लागले ध्यानी |ते परसोबा लाधले येरा मूर्खा भुलवणी ॥७॥
तापले लोहो तेणे शेखियेले जीवन | तैसे अंतरी निवाले आपोआप आपण |
परसा भागवत हे सकळांचे जीवन | विष्णुदास नामा त्याचे चरणीचे रजरेण ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग