सेवकाचि परि स्थापिला
834.
सेवकाचि परि स्थापिला पदी ।
मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥
तैसेचि केले मजही देवा ।
निपेक्ष अवघा दावूनिया ॥२॥
आईता वाटा दिधली जोडी ।
कवडीने कवडी सांचिली ते ॥३॥
निळा म्हणे देवा आभारचि केले ।
मल सेवका गौरविले आपुलिया ॥४॥
