वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १२, स्वरूप स्थिती अभंग ८३५ ते ८४१

सहा चार अठरा धांडोळि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074575 · अभंग क्र. ८३५

835.
सहा चार अठरा धांडोळिती ज्यांते ।
परी नेणवे सखा तो जवळी असता ॥१॥
सखा निजसुखाचा जवळी असता ।
पुढे पाहता जाले वेडे चौघेजण ॥२॥
बोलो तरी आता मौन्य पडिले माये ।
शब्द हा न साहे सांगो कैसे ॥३॥
चिद्रूपाचा प्रकाश तोची आनंदाचा साभास ।
गुणागुणी नाश नातळेची ॥४॥
ते गिळुनीया द्वंद्वासहित प्रपंचभास ।
तेथ स्थुळादि ब्रह्मांडास गिळुनी ठेले ॥५॥
ऐसिया सुख वस्ती आत्मप्रभा संविती ।
प्रकाशी प्रकाश स्थिति पूर्ण ठेली ॥६॥
तेथ बिंब प्रतिबिंब भान सरले ज्ञानविज्ञान ।
हाचि नवलाव जाण तये ठायी ॥७॥
निवृत्तिदास म्हणे ज्याचे तो जाणे ।
आता जे बोलणे तोचि शीण ॥८॥

अर्थ :
सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे ज्याचा शोध करीत आहेत तो परमात्माजवळच असूनही त्यांना सापडत नाही. परमात्मा जवळ असतांना चारी वेद त्याला पुढे करून पाहू गेले. तो वेडे झाले. त्याच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयल करावा तर त्याचे स्वरूप शब्दांनी वर्णन करण्यासारखे नसल्यामुळे मौनच स्विकारावे लागते. कारण शब्दाने त्याचे काहीच वर्णन करता येत नाही. त्याच्या ठिकाणच्या ज्ञानाचा प्रकाश तो आनंदाचा उदय होय. त्याच्या ठिकाणी गुण लागत नसल्यामुळे त्याला गुणीपणा येत नाही. म्हणून गुणी विशेषण त्याला लागू शकत नाही. त्याचे अव्यक्तस्वरूप टांकून व्यक्त स्वरूपांकडे नजर दिली तर सुखदुःखादि द्वंद्वे ज्यांत आहेत असा प्रपंच त्याचे स्वरूपांत लय पावतो. अशारितीने जगतांत असलेले ज्ञान, तेज, आनंद ही सर्व त्याच्याच ठिकाणी स्वतःसिद्ध आहेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेच मोठे आश्चर्य आहे की त्याच्या स्वरूपात बिंब प्रतिबिंब, ज्ञान, विज्ञान वगैरे सर्व भाव मावळूनजातात. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे याहून आणिक काही बोलणे हा शीणच होय असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग