वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

यम सांगे दूता कानी |

🙏 4. संत नामदेव · ABH-083226 · अभंग क्र. ८५०

850.
यम सांगे दूता कानी | तुम्ही जाता मेदिनी |विष्णुभक्त चुकवुनि | येर बांधोनि आणा ॥१॥
दूत सांगता यमा | दिंडीपुढे चाले नामा |ते नागविती आम्हा | विष्णुदूत म्हणोनी ॥२॥
जे नेणती धर्मवेळा | वाचे न उच्चारिती गोपाळा |तयासि जाचवावे वेळोवेळा | एकविस कुळांसहित ॥३॥
जे न करिती हरिची भक्ती | तयांसी जाचवावे पुढता पुढती |रघुनाथनाम जयाच्या कंठी | त्याच्या वाटे नवजावे ॥४॥
दिंडी पताका गजर टाळघोषांचा | नाद उमटतो अंबरीचा |तेथे पाड नाही काळाचा | शिंपी नामा तळपतो केशवरायाचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग