ऐका नामाचे महिमान ।
838.
ऐका नामाचे महिमान । नामे पातकी पावन । तरले ते अधम जन । कलयुगामाझारी ॥१॥ धन्य धन्य राम पावन । सर्व साधनांचे साधन । मोक्ष नामचि पूर्ण । स्मरतांचि जोडे ॥२॥ न लगे आन विधि मुद्रा । न लगे तपांचा डोंगरां । कासया हिंडताती सैरा । नामजपा सादर ॥३॥ भोळ्या भाविकां हे वर्म । दृढ जपावे हो नाम । एका जनार्दनी धाम । पावे वैकुंठीचें ॥४॥
