म्हणे दीनबंधू तुम्ही
838.
म्हणे दीनबंधू तुम्ही सावध व्हावे |संतांशी नमन नाम वाचे जपावे ॥१॥
नामाविण साधन नाही या कलियुगी|व्यर्थ श्रम होती पाहता मत्ते ॥२॥
मताभिमान करणे नि तुम्ही जाल आड वाटां|अभिमाने ठकविले नारदादि श्रेष्ठा ॥३॥
आलिया जन्मांस आता न करी आळस|नामदेवालागी सांगे जगन्निवास ॥४॥
