यम सांगू गेला वैकुंठ
849.
यम सांगू गेला वैकुंठा | देवा सांभाळा जी आपुल्या मठा |आम्ही नवजाऊ तयाचिया वाटा | वैष्णव दूत नागवती ॥१॥
कुंभिपाक पडला ओस | दूता लागला त्रास |देवा कोपेल महेश | म्हणोनी सांगावया आलो ॥२॥
देवा तुम्ही एक वोखटे केले | गंगेसि मृत्युलोकासी पाठविले |तेणे थोर कार्य नाशिले | हा प्रसाद गौतमाचा ॥३॥
ऐसे वैष्णवदूती गांजिलो | तुजप्रति सांगावया आलो |देवे पाहिजे मना आणिलो | माझे साह्य करावे स्वामी ॥४॥
विशेष शिंपी नामा | तो पंढरीये पुरुषोत्तमा |हाचि बोल ऐकूनि प्रेमा | त्याच्या शिवाणा न जावे ॥५॥
