वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १२, स्वरूप स्थिती अभंग ८३५ ते ८४१

अवघाची शृंगारू डोईजे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074572 · अभंग क्र. ८३७

837.
अवघाची शृंगारू डोईजे दुरडी ।
डोळेची मुरडी परतोनिया ॥१॥
देखिले स्वरूप विठ्ठल नामरूप ।
पारूषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल सुखनिधी ।
अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥

अर्थ :
दूध विकावयास जाणाऱ्या गौळणी कितीही शृंगार अंगावर घातला तरी ती इकडे तिकडे पाहात जरी चालली तरी तिचे लक्ष डोक्यावरच्या दुरडीवरच असते. त्याप्रमाणे बाहा व्यवहार करणाऱ्या पुरूषांने श्रीविठ्ठलाचे नामरूप एकदा जरी पाहीले. व ब्रह्मसुख प्रगट झाले तर त्याचे चित्त चरणाहून दुसरीकडे जाणार नाही. आनंदसागर जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिल्याबरोबर माझी देहादि सर्व उपाधि तुटून गेली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग