वैष्णवा घरी सर्वकाळ
843.
वैष्णवा घरी सर्वकाळ | झणझणिती टाळ ॥१॥
कण्या भाकरीचे खाणे | गाठी रामनाम नाणे ॥२॥
बैसावयासी कांबळा | द्वारी तुळसी रंगमाळा ॥३॥
घरी दुभे कामधेनु | तुपावरी तुळसीपानु ॥४॥
फराळासी पीठ लाह्या | वेळोवेळी पडती पाया ॥५॥
नामा म्हणे नलगे काही | चित्त रंगले हरीचे पायी ॥६॥
