रविरश्मि धरोनि स्वर्
844.
रविरश्मि धरोनि स्वर्गी जाऊ येईल | परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥१॥
वैतरणी उतरोनि वैकुंठा जाऊ येईल | परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे नकळे ॥२॥
स्वप्नीचा ठेवा साचहि होईल | परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे नकळे ॥३॥
मायबाप बंधू भगिनी मिळे योनी | परि साधुची मिळणी भाग्ययोगे ॥४॥
तपे व्रते दाने गोविंद पै भेटे | परि साधु तव न भेटे भाग्येविण ॥५॥
नामा म्हणे केशवा बरा साधुसंग | या वेगळा भवरोग न तुटे न तुटे ॥६॥
