शोधूनी अन्वये वंशवंश
847.
शोधूनी अन्वये वंशवंशावळी ।
परंपरा कुळी उच्चारण ॥१॥
म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे ।
केले सामरस्ये समाधान ॥२॥
येक छत्र झळके उन्मनि निशाणी ।
अनुहाताचा ध्वनि गगन गर्जे ॥३॥
निळयास्वामी स्थापी निजपदी दासा ।
करुनि उल्हास आवडिचा ॥४॥
