उत्तम अधम येथे नाही
836.
उत्तम अधम येथे नाही काम । जपे तू श्रीराम सर्वकाळ ॥१॥ मंत्रतप कांही योगाची धारणा । न लगे नामस्मरणा वांचुनियां ॥२॥ योग याग तप वाउगा बोभाट । अष्टांग नेटपाट न लगें कांही ॥३॥ एका जनार्दनी गावें मुखी नाम । तेणे वारे काम क्रोध सर्व ॥४॥
