नाही जातिकूळ तुझे म्
839.
नाही जातिकूळ तुझे म्या पुशिले ।
परी मन मावळले देखोनिया ॥१॥
तुझेंची कुवाडे सांगेन तुजपुढे ।
तेणे मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥
दुजापाशी सांगता वाटे लाजिरवाणे ।
हांसतील पिसुणे प्रपंचाची ॥३॥
आता उगवितांची भले नुगविता सांपडले ।
ज्ञानदेव बोले निवृत्तीशी ॥४॥
अर्थ :
सगुण साकार परमेश्वरांचे दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा, तुझी जात कुळ वगैरे मी काही विचारले नाही. तुला पाहून माझे मन विरघळून गेले. आता तुझ्यापुढे तुझ्याच गोष्टी सांगेन व या कीर्तनरूप भक्तीने आमच्याकरिता मोक्षांची द्वारे सहज उघडली जातील इतर अनधिकारी माणसापुढे ही स्थिति सांगण्याची लाज वाटते. बरे त्यांना या स्थितीचे वर्णन करू गेले तर त्यांना त्याचे काहीच महत्त्व वाटणार नाही. उलट ते ऐकून हासावयास लागतील कारण ते प्रपंच विषयकच वेडी झालेली असतात. हे निवृत्तीराया माझे पूर्वपाप फळाला न येता केवल पुण्य फलोन्मुख झाल्यामुळेच मला हे स्वरूप दिसले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
