वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १, गायीच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८४८ ते ८५३

काळी कोसी कपिला धेनु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074608 · अभंग क्र. ८५१

851.
काळी कोसी कपिला धेनु रे ।
तिचे दुभते काय वानू रे ।
तिसी बापमाय दोन्ही नाही रे ।
ते असक्रिया वेगळी पाहे रे कान्हो ॥१॥
ती अखरींच चरे रे ।
सर्वसाक्षी वरती जाय रे कान्हो ॥धृ॥
पैल येकी सहस्रमुखी रे ।
तिहींहूनी येकी आहे रे ।
तिची नांवे अनंत पाहे रे ।
तिसी बापमाय कोण रे कान्हो ॥२॥
बापरखुमादेविवरी विठ्ठली पाहे रे ।
ते पुंडलिकाचे द्वारी जाय रे ।
तिचे दुभते अपरंपार रे ।
तेंदुभते सहस्रधारी रे कान्हो ॥३॥

अर्थ :
एक काळी कपिला गाय आहे. तिचे दुभते काय वर्णन करावे? तिला आईबाप दोन्हीही नाही. (अजन्मा असल्यामुळे) आणि असक्रिया म्हणजे ती सर्वाहून वेगळी आहे. ती आपल्या अखरी म्हणजे चरणाच्या जागी चरत आहे. व ती सर्वांची साक्षी आहे. दुसरी जी एक सहस्रमुखी गाय आहे. व आणखी एक तीन गुणांच्या पलीकडची गाय निर्गुण अशी आहे. तिला अनंत नावे आहेत. तिचे आईबाप कोण आहेत सांग पाहू. ती गाय म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे असून पुंडलिकाचे द्वारांकडे गेलेले आहेत. तिचे दुभते अपरंपार म्हणजे हजारोधारांनी ती दूध देत आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग