लोह परिसासी झगटे । म
849.
लोह परिसासी झगटे । मग काळिमा कैची भेटे ॥१॥
तैसे विनटो रामनामा । पहिलेंपण कैंचें आम्हा ॥२॥
गंगा मीनली सागरी । ती परतेना ब्रह्मागिरि ॥३॥
नीच रतली रायासी । तिची कोण म्हणेल दासी ॥४॥
हरिभक्तांचे संगती । अभक्तांही उपजे भक्ति ॥५॥
एक जनार्दनी भेटी । चौदेहांची सुटें गांठी ॥६॥
