महासुखा पारणे होये ।
844.
महासुखा पारणे होये ।
आनंद राहे लिगटोनी त्या ॥१॥
ऐशिया पावविलो विश्रांती ।
निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥
मनही तेथुनी वेगळेचि नोहे ।
पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥
निळा म्हणे रवि शशी ।
हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥
844.
महासुखा पारणे होये ।
आनंद राहे लिगटोनी त्या ॥१॥
ऐशिया पावविलो विश्रांती ।
निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥
मनही तेथुनी वेगळेचि नोहे ।
पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥
निळा म्हणे रवि शशी ।
हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥