वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

सांडोनि नित्य नेम कर

🙏 4. संत नामदेव · ABH-083235 · अभंग क्र. ८५१

851.
सांडोनि नित्य नेम कर्म | बोलती कळिकाळाचे वर्म ॥१॥
नामधारक नामाचे | जाले डिंगर केशवाचे ॥२॥
टाळ मृदंग वाजती | टके पताका शोभती ॥३॥
कंठी तुळसीच्या माळा | वज्र पंजराचा टिळा ॥४॥
शंख चक्र मुद्रा धरणे | अंगी मिरविती भूषणे ॥५॥
सतरंज उधळले | तेणे सर्वांग डवरले ॥६॥
सहस्रनामे गर्जित | तेणे पळाले यमदूत ॥७॥
नामा म्हणे ते माझे सखे | स्वामी विठोबासारखे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग