वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १, गायीच्या रूपकाने हरीचे वर्णन अभंग ८४८ ते ८५३

तिही त्रिपुटी तिचे व

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074610 · अभंग क्र. ८५०

850.
तिही त्रिपुटी तिचे वाडे रे ।
सवालक्ष चरावया जाय रे ।
ते दैत्यापाठी हुंबरत लागे रे ।
भक्ता घरी दुभे सानुरागे रे कान्हो ॥१॥
तिचे नाम शांभवी आहे रे ।
तिची रुपरेखा ते काय रे कान्हो ॥२॥
येकी चौमुखी गाय पाहे रे ।
तिचा विस्तार बहु आहे रे ।
तिच्या नाभिकमळी जन्म वासु सांगे रे ।
तिसी आदि पुरुषु बाप माय रे कान्हो ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलु पाही रे ।
ते भक्ता ओळली आहे रे ।
ते दोहता भरणा पोहे रे ।
चारी धारा वर्षत आहे रे कान्हो ॥४॥

अर्थ :
भोक्ता, भोग्य, भोग इत्यादि त्रिपुटीचा व्यवहार चालणारे तिन्ही लोक हे तिचे वाडे आहेत. व जी आपण 'सवालक्ष चरावया जाये रे' म्हणजे तिच्याकडून दररोज सवालक्षाची घडामोड होते. व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते. आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते. तिचे नाव शांभवी असे आहे. तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती? एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे. ती तू पहा. जिचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे. तिच्या नाभिकमळी जन्म असून, आदिपुरूष परमात्मा तिचे आईबाप आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहा. त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार धारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग