काय आम्हापाशी आहे धन
1675.
काय आम्हापाशी आहे धन वित्त | दान ते उचित देऊ काय ॥१॥
देता घेता आम्हा पुरे पुरे जाले | संगती त्यागिले भिवोनिया ॥२॥
काय वाणू गुण भिकारपणाची | होसी पंढरीची नामनीका ॥३॥
नामा म्हणे पुढे दाखवी मारग | आम्ही तुज मार्गे येऊ सुखे ॥४॥
