कृपा करोनि त्वा मज प
1666.
कृपा करोनि त्वा मज प्रसन्न व्हावे | आणि म्या मागावे बुद्धिज्ञान ॥१॥
ऐसी भुली मज न घाली पांडुरंगा | बिघड संत्संगा न करी मज ॥२॥
मोक्षासी साधन एका ते उपाधी | दाखवुनि बुद्धिभ्रंश केले ॥३॥
एका पुत्र कलत्र राज्याचा संभ्रम | दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥
नामा म्हणे तुझ्या प्रेमालागी भक्ति | घेतली म्या सुती जन्ममरणे ॥५॥
