वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

माझिया मनाचे हिंडणे

🙏 4. संत नामदेव · ABH-082912 · अभंग क्र. १६९५

1695.
माझिया मनाचे हिंडणे जे जे ठायी | तेथे तेथे राही पांडुरंगा ॥१॥
भीमा चंद्रभागा वैकुंठ पंढरी | दावी दृष्टीभरी निरंतर ॥२॥
पुंडलिकासमोर लक्ष निरंतरी | तैसाची अंतरी येऊनि राहे ॥३॥
कटी कर विटे समचरण गोमटे | पाहता अति निकट हेंचि ध्यान ॥४॥
पुरवी माझी आस तू बाप माउली | करी मज साउली पद्मकरे ॥५॥
नामा म्हणे झणे करिसी उदास होती कासावीस प्राण माझे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग