कृपणाचे धन असे भूमि
1682.
कृपणाचे धन असे भूमि आंत | तेथे जाय चित्त जेथे धन ॥१॥
ऐसी मज देवा लावावी हे सवे | हेंचि मज द्यावे पांडुरंगा ॥२॥
जेथे जेथे मन जाईल हे माझे | तेथे तेथे तुझे रूप भासे ॥३॥
नामा म्हणे मी सर्वोपरी अज्ञान विभवी आम करून पांडुरंगा ॥४॥
