वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

माझे गुणदोष जरि विचा

🙏 4. संत नामदेव · ABH-082901 · अभंग क्र. १६७७

1677.
माझे गुणदोष जरि विचारिसी | सर्व नारायणा अपराधी ॥१॥
सेवाहीन दीन पातकाची रासी | आता विचारिसी काय ऐसे ॥२॥
अंगुष्ठ धरूनि मस्तकापर्यंत | अखंड दुष्कृत आचरलो ॥३॥
स्वप्नामाजी तुझी घडली नाही भक्ति | पुससी विरक्ति कोठोनिया ॥४॥
तूंचि माझा गुरु तूंचि माझा स्वामी | सकळ अंतर्यामी वससी तू ॥५॥
नामा म्हणे माझे चुकवी जन्ममरण | न करी मी सीण पांडुरंगा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग