अनंता जन्मींचे चुकवी
1667.
अनंता जन्मींचे चुकवी सांकडे | काय मी बापुडे वानु कैसे ॥१॥
सगुण गुणाची वोळलिसे मूर्ति | राहो माझे चित्ती निरंतर ॥२॥
माझा मीच जालो सकळ व्यापारी | संसारा बाहेरी काढी कोण ॥३॥
नामा म्हणे मज नको गोवू आशा | पावन परेशा केशिराजा ॥४॥
