होईन मी दास कामारी स
1690.
होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥
घालीन लोटांगण करीन पुजन । भावे वोवाळीन प्राण माझा ॥२॥
आणिक सायास न करी कांही आस । होईल निजदास संतचरणी ॥३॥
एका जनार्दनी हेंचि वाटे बरें । आणिक दुसरे नको कांही ॥४॥