आषाढी पर्वकाळ । निघत
1684.
आषाढी पर्वकाळ । निघताती संतमेळ । करिती गदारोळ । विठ्ठलकीर्तनीं ॥१॥
धन्य धन्य त्यांचे कुळ । पावन ते सकळ । येवोनि उतावीळ । विठ्ठल भेटती ॥२॥
करती चंद्रभागे स्त्रान । पुंडलिकाचें अभिवंदन । तीर्थ प्रदक्षिणा दरुशन । विठ्ठलाचें ॥३॥
एकादशी करती व्रत । नमें जागरण करीत । आनंदे भरीत नाचत । विठ्ठलासमोर ॥४॥
ऐसे भाळे भोळे सकळ । विठ्ठलाचे लडिवाळ । एका जनार्दनी कृपाळ । विठ्ठल माझा ॥५॥
