प्रपंचाविषयी नव्हतो
1693.
प्रपंचाविषयी नव्हतो आम्ही दीन । दिनानाथ कोण म्हणे तुज ॥१॥
सुष्ट दुष्ट तरी माझे आचरण । ते तुज भूषण झाले देवा ॥२॥
पतीतपावन कैसोनी जोडतो । जरी ते न्हवते कर्म आड ॥३॥
नामा म्हणे ऐसा आहेसी गा देवा । विचारिसी केशवा मायबापा ॥४॥