वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

सापडला हाती । तरी जा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080297 · अभंग क्र. १६८६

1686.
सापडला हाती । तरी जाली हे निश्चिंती ॥१॥
नाही धावा घेत मन । इंद्रियांचे समाधान ॥धृपद॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनिया घेतो नाम ॥३॥

अर्थ :
माझ्या हाती तुला साध्य करण्याचे वर्म लागले आहे त्यामुळे आता मी खऱ्याअर्थाने निश्चिन्त झालो आहे. त्यामुळे माझे मन देखील आता इंद्रियांच्या ओढीने धाव घेत नाही किंबहुना माझी सर्वच इंद्रिये अतिशय समाधानी झाली आहेत. तसेच माझ्या मनाला आता कसलाही आणि कोणताही हेवा नाही, सर्वच अपेक्षांचा आणि संचिताचा त्याच्याकडून त्याग झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढेच नव्हे तर माझ्या मनाने आता एवढी मजल मारली आहे की सर्व काम आणि कामना ह्यांचा त्याला विसर पडून ते फक्त आणि फक्त आता हरीचे नाम घेण्यात गुंतले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग