नरदेहीचा हाचि मुख्य
1670.
नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥
आणिक नाही पा साधन । मुखी हरि हरि स्मरण ॥२॥
सोडी द्रव्य दारा आशा संतसंगे दशा पावावी ॥३॥
जरी पोखालें शरीर । तरी ते केव्हाहीं जाणार ॥४॥
जनार्दनाचा एका म्हणे । संतापायी ठाव देणे ॥५॥
