देहाचिया आशा पुत्राद
1688.
देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥
सांडोनि उपाधी करावे भजन । तेणे जनार्दन कृपा करी ॥२॥
एका जनार्दनी निराशी तो धन्य । तयाचे चरण वंदु आम्ही ॥३॥