पुंडलिक वरद आनंदे अभ
1685.
पुंडलिक वरद आनंदे अभेद | विठ्ठल विद्गद नाम तुझे ॥१॥
पाव गा वेगी मजलागी झडकारी | बुडतो भवसागरी तारी मज ॥२॥
आकांत अवसरी स्मरिला गजेंद्र | दीनानाथ ब्रीद साच केले ॥३॥
स्मरली संकटी द्रौपदी वनवासी| धांवुनि आलासी लवलाही ॥४॥
प्रल्हादे तुजलागी स्मरिले निर्वाणी | संकटापासुनि रक्षियेले ॥५॥
नामा म्हणे थोर पिडिलो गर्भवासे | अखंड पाहातसे वाट तुझी ॥६॥
