ऐसी प्राप्ति कै लाही
1687.
ऐसी प्राप्ति कै लाहीन । संतसंगती राहीन ।
त्यांचे संगती मी ध्याईन । नाम गाईन अहर्निशी ॥१॥
भावे धरलिया संतसंग । सकळ संगा होय भंग ।
अभयसितां आगळे योग । पळे भवरोग आपभयें ॥२॥
सेविलिया संतचरणतीर्था । तीर्थ पायवणी वोढविती माथा ।
सुरनर असुर वंदिती तत्त्वता । ब्रह्मा सायुज्यता घर रिघे ॥३॥
संतचरणरज मस्तकी पडे । देह संदेह समुळ उडे ।
उघडिलीं मुक्तीची कवाडे । कोदाटें पुढे परब्रह्मा ॥४॥
दृढ धरलिया सत्संगती । अलभ्य लाभ आतुडे हाती ।
चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । पाया लागती निज्दास्य ॥५॥
जै कृपा करिती संतजन । जन विजन होय जनार्दन ।
एका जनार्दनी शरण । ब्रह्मा परिपुर्ण तो लाहे ॥६॥
