सगुण चरित्रें परम पव
1675.
सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्नावी । सज्जनवृदें मनोभावे आधी वंदावीं ॥१॥
संतसंगे अंतरंगे नाम बोलावें । कीर्तनरंगें देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरां न कराव्या । प्रमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥
जेणे करुनी मुर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची । ऐशी कीर्तनमार्यादा आहे संतांच्या घरची ॥४॥
अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवीं करटाळी । एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ॥५॥
