संताचिये द्वारी होईन
1691.
संताचिये द्वारी होईन द्वारपाळ । न सांगता सकळ करीन काम ॥१॥
तेणे माझ्या जीवा होईल समाधान । यापरतें साधन आणिक नाही ॥२॥
शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥३॥
एका जनार्दनी हेंचि पै मागत । नाही दुजा हेत सेवेविण ॥४॥
