वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 191. सख्य

आसनी शयनी आठवी अनुदि

🙏 4. संत नामदेव · ABH-082931 · अभंग क्र. १६९६

1696.
आसनी शयनी आठवी अनुदिनी | नित्य समाधानी रूप तुझे ॥१॥
काम धाम कांही नलगे माझ्या चित्ती | न देखे विश्रांति तुजविण ॥२॥
तापत्रय ओणवा लागला चहूंकडे | न देखे उघडे तुजविण ॥३॥
तुजविण ते जिवलग दुर्जे कोण होईल | ते माझे निवारील उद्वेग हे ॥४॥
कृपेचा सागरू त्रिभुवनी उदारू | न करी अव्हेरू अनाथाचा ॥५॥
नामा म्हणे केशवा आस माझी पुरवी | पाउले दाखवी एक वेळा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग