संत सज्जन जिवलग माझे
1689.
संत सज्जन जिवलग माझे । त्यांचे चरण चुरीन वोजे ॥१॥
त्यांचे संगे सुख मना होय । आनंद आनंदी पाहता होय ॥२॥
त्यांचे पिसे मजलागी मोठें । ऐसे भाविक केवी भेटे ॥३॥
त्यांचे नामाची घेऊ धणीं । तया जाऊ लोटांगणी ॥४॥
तया शेजार करिता बरा । चुके जन्ममरण फेरा ॥५॥
तया जीव करु कुर्वंडी पाही । एका जनार्दनी लागतसे पायी ॥६॥
