अनुपम्य सुख संताचिया
1695.
अनुपम्य सुख संताचिया पायी । राहीन तये ठायी अखंडित ॥१॥
अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिका जोडी ऐशीं नाही ॥२॥
सर्व पर्वकाळ आले तया ठायां । विश्रांती घ्यावया इच्छिताती ॥३॥
एका जनार्दनी सुखाचे माहेर । भवसिंधुपार तारक हे ॥४॥
